पालक आणि विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट, राज्यातील सर्व शाळा दोन दिवस बंद? जाणून घ्या तारखा Schools Closed

Schools Closed: राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी 8-9 जुलै रोजी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अनुदानाच्या मागण्यांवर शासनाने ठोस कारवाई न केल्याने आंदोलन होणार आहे.

वारंवार आश्वासने देऊनही शासनाने मागण्यांवर कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांनी केला आहे. यामुळे दोन दिवस शाळा बंद ठेवावी लागू शकते.

लाडकी बहिणी योजनेचे दोन महिन्याचे 3000 हजार रुपये “या” दिवशी येणार खात्यात Ladki bahin yojna june instalment

प्रलंबित मागण्या आणि शासनाचे आश्वासनभंग

Schools Closed

गेल्या वर्षी 1 ऑगस्ट 2024 पासून या कर्मचाऱ्यांनी 75 दिवस राज्यव्यापी आंदोलन करून वाढीव आर्थिक अनुदानाची मागणी केली होती. त्यावेळी सरकारने सकारात्मक भूमिका घेतली होती. परंतु 14 ऑक्टोबर 2024 रोजी काढलेल्या अधिकृत सरकारी ठरावानुसार निधी वितरण करण्यात अपयश आले. ज्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नव्याने नाराजी पसरली.
याच दरम्यान, 10 ऑक्टोबर 2024 रोजी तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनुदानाचा पुढील हप्ता देण्याचे आश्वासनही देण्यात आले होते. मात्र जवळपास एक वर्ष उलटून गेल्यावरही त्या आश्वासनांची पूर्तता झाली नसल्याने कर्मचारी संघटना पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

आझाद मैदानावर आंदोलन 

Schools Closed

8 आणि 9 जुलै रोजी विविध शाळांमधील हजारो शिक्षक मुंबईतील आझाद मैदानावर एकत्र येऊन आंदोलन करणार आहेत. शासनाने त्वरित निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
या आंदोलनाला महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघटना, संयुक्त मुख्याध्यापक संघटना आणि इतर अनेक शिक्षक संघटनांनी बिनशर्त पाठिंबा दिला आहे. संघटनांच्या म्हणण्यानुसार जर शासनाने यापुढेही दुर्लक्ष केले तर त्याचा परिणाम संपूर्ण राज्यातील शिक्षण व्यवस्थेवर खोलवर होईल.

Leave a Comment