PM Kisan 20th Installment : पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 20व्या हप्त्याची प्रतीक्षा लवकरच संपेल. योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये दिले जातात.
लवकरच खात्यात येणार 2000 रुपये
यादीत नाव कसं तपासायचं?
दरवर्षी मिळतो 6 हजार रुपयांचा लाभ
हप्त्याची घोषणा कधी होणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावरून परतताच, पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याची (PM Kisan 20th Installment Update) अधिकृत घोषणा केली जाणार आहे. योजनेसंदर्भातील सर्व तांत्रिक व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. आता केवळ शेवटची मंजुरी आणि अधिकृत अधिसूचना बाकी आहे.(PM Kisan 20th Installment Update)
हप्ता मिळवण्यापूर्वी ‘हे’ नक्की तपासा!
शेतकऱ्यांना आपले नाव लाभार्थी यादीत (Beneficiary List) आहे का, याची खात्री करून घ्यावी. अनेकदा आधार क्रमांक, बँक डिटेल्समधील चुका किंवा माहितीतील विसंगतीमुळे हप्ता अडकण्याची शक्यता असते.
असे तपासा यादीत नाव
१. pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जा
२. “Farmer Corner” मध्ये “Beneficiary List” वर क्लिक करा
३. राज्य, जिल्हा, उप-जिल्हा, तालुका आणि गावाची माहिती भरा
४. सबमिट केल्यानंतर सूचीमध्ये आपले नाव शोधा
असे तपासा Beneficiary Status
१. “Farmer Corner” मध्ये “Beneficiary Status” वर क्लिक करा
२. आधार नंबर, मोबाईल नंबर किंवा बँक खाते क्रमांक टाका
३. सबमिट केल्यानंतर आपल्या खात्यावर पैसे आले का हे पाहता येईल
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना हे शेतकऱ्यांसाठी सरकारचे महत्त्वाचे पाऊल असून, त्याचा लाभ घेण्यासाठी योग्य कागदपत्रे आणि अचूक माहिती असणे अत्यावश्यक आहे.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनाचा पहिला हप्ता कधी आला?
ही योजना 2019 मध्ये सुरू करण्यात आली. पहिल्यांदाच बिहारमधील भागलपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा लाभ देण्यात आला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9.08 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 22 हजार कोटी रुपये हस्तांतरित केले.