डीलरला किती कमिशन मिळते? डीलरला किती कमिशन मिळते? एचपीसीएल, आयओसी आणि बीपीसीएल सारख्या भारतीय पेट्रोलियम कंपन्या वेळोवेळी कमिशनमध्ये सुधारणा करत असतात. सध्या दिल्लीबद्दल बोलायचे झाले तर राष्ट्रीय राजधानीत एक लिटर पेट्रोल विकण्यासाठी डीलरला 4.40 रुपये (सरासरी) कमिशन मिळते. तर डिझेलवरील कमिशन थोडे कमी असल्याने पंप मालकाला एक लिटर डिझेल विकण्यासाठी 3.03 रुपये (सरासरी) कमिशन दिले जाते. आयओसीएल आणि एचपीसीएलच्या अधिकृत साइटवरून डीलरच्या एक लिटरवरील कमिशनशी संबंधित ही माहिती घेण्यात आली आहे. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की कमिशनची रक्कम प्रत्येक राज्यात वेगवेगळी असू शकते.