सरकारने सांगितले आहे की, जुलै 2025 मध्ये १३वा हप्ता २४ तारखेला जमा होऊ शकतो. पण कधी कधी थोडा उशीर होतो. त्यामुळे जर पैसे त्या दिवशी आले नाहीत, तर ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे.
पण ही योजना सगळ्याच महिलांसाठी नाही. काही नियम आहेत. जसे की –
- महिला महाराष्ट्रात राहणारी असावी.
- तिचं वय 21 ते 65 वर्षांदरम्यान असावं.
- ती महिला आयकर भरत नसावी.
- तिचं कुटुंब वर्षाला ₹2.5 लाखांपेक्षा कमी कमवत असावं.
- तिचं आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेलं असावं.
- बँक खाते DBT साठी चालू असावं.