Viral Teacher Video : अशी शिक्षिका होणे नाही, ‘गुलाबी शरारा’ गाण्यावर केला तुफान डान्स, विद्यार्थीही पाहतच राहिले VIDEO

Viral Teacher Video:सोशल मीडियाने अनेक विस्मृतीत गेलेल्या गाण्यांनाही पुन्हा ओळख मिळवून दिली आहे. इन्स्टाग्रामवर व्हायरल झाल्यानंतर, अशी अनेक गाणी नेटिझन्समध्ये लोकप्रिय झाली आहेत जी कदाचित त्यांनी या पूर्वी कधीही ऐकली नसतील. आजकाल ‘गुलाबी शरारा’ नावाचं असंच एक गाणं इन्स्टाग्रामवर लोकप्रिय झालं आहे. या गाण्याचा वापर करून तयार केलेला एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका शाळेतील शिक्षिका ‘गुलाबी शरारा’ या सुपरहिट पहाडी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

‘गुलाबी शरारा’ गाण्यावर केला तुफान डान्स

व्हिडिओ पाहण्यासाठी

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये शिक्षिकेसोबत शाळेतील विद्यार्थीही डान्स करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर ट्रेंड होत असलेला हा व्हिडिओ पाहून सर्व युजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये दिसणारी शिक्षिका शाळेत फिजिक्स हा विषय शिकवते. सहसा फिजिक्स शिकवणाऱ्या शिक्षकाला विद्यार्थी घाबरत असतात. हे विद्यार्थी मात्र, आपल्या फिजिक्सच्या शिक्षिकेसोबत मजेत नाचताना दिसत आहेत.

Viral Teacher Video

व्हायरल होत असलेल्या या शिक्षिकेचं नाव काजल सुदानी आहे. तिनं स्वत: हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना तिने लिहिलं की, “या व्हिडिओला आतापर्यंत एकूण 70 लाख व्ह्यूज मिळाले आहेत. तुमचा जोश आणि उत्साह माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.” ती एक शिस्तप्रिय शिक्षिका आहे. पण, कधीकधी विद्यार्थ्यांसोबत मजा देखील करते. ज्या दिवशी हा व्हिडिओ चित्रित केला त्या दिवशी शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन होतं, असंही तिनं स्पष्ट केलं आहे.

या व्हिडिओवर येणाऱ्या कमेंट्सने सर्वाधिक लक्ष वेधलं आहे. अनेक सोशल मीडिया युजर्सनी या व्हिडिओवर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका युजरनं कमेंट केली की, आमच्या काळात असे शिक्षक का नव्हते? आणखी एका युजरने कमेंट केली की, त्यालाही (काजल मॅडमच्या) शाळेत प्रवेश हवा आहे.

सध्याच्या काळात सोशल मीडिया हा टाईमपासचं आणि मनोरंजनाचं मुख्य साधन बनलं आहे. गमतीशीर व्हिडिओंसोबतच सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या गोष्टी उपलब्ध आहेत. विविध प्रकारच्या व्हिडिओंसोबतच अनेक प्रकारचे ट्रिकी फोटोज्, रीडल्स, रील्स आणि ऑप्टिकल इल्युजन क्रिएट करणारे प्रश्न या ठिकाणी व्हायरल होतात. इन्स्टाग्राम रील्स हा प्रकार तर सध्या विशेष लोकप्रिय आहे.

Leave a Comment