लाडक्या बहिणींना दिलासा देणारी बातमी! जुलैच्या हप्त्यापूर्वीच मिळाली ‘दुहेरी’ खुशखबर Maharashtra Ladki Bahin Yojana

Maharashtra Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) अंतर्गत जून महिन्यापर्यंतचा हप्ता सुमारे 2.5 कोटी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाला आहे, तर जुलै महिन्याच्या ₹1500 च्या हप्त्याची प्रतीक्षा अद्याप सुरू आहे. आतापर्यंत लाभार्थींना एकूण 12 हप्त्यांमध्ये ₹18,000 मिळाले आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

खाद्यतेलाच्या दरात तब्बल इतक्या रुपयांची घसरण पहा 15 लिटर डब्याचे नवीन दर price of edible oil

Maharashtra Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana अंतर्गत पात्र महिलांना दिलासा देणारी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ही योजना जुलै 2024 मध्ये सुरू करण्यात आली होती आणि आतापर्यंत पात्र लाभार्थींना सलग 12 हप्ते मिळाले आहेत. म्हणजेच जुलै 2024 ते जून 2025 या काळात दरमहा जमा होणारी रक्कम थेट खात्यावर जमा करण्यात आली आहे.

जूनच्या हप्त्याचा व्यवहार पूर्ण, परंतु काहींना अजूनही प्रतीक्षा

जुलै 2025 च्या पहिल्या आठवड्यात या योजनेअंतर्गत 12वा हप्ता म्हणजेच जून महिन्याचा ₹1500 चा हप्ता जमा करण्यात आला. त्यासाठी आवश्यक असलेला ₹3600 कोटींचा निधी जूनच्या अखेरच्या आठवड्यात आर्थिक विभागाकडून मंजूर झाला होता. मात्र, काही महिलांच्या खात्यावर ही रक्कम जमा झाल्याचे अद्यापही दिसून आलेले नाही, अशी तक्रार अनेकांनी केली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ज्या लाभार्थींना जूनचा हप्ता मिळालेला नाही, त्यांना जुलैच्या हप्त्याबरोबर एकत्र दोन्ही महिन्यांचे म्हणजेच ₹3000 (₹1500 + ₹1500) मिळण्याची शक्यता आहे. अर्थात, यासंबंधी सरकारकडून अजून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जुलैचा हप्ता नेमका कधी मिळणार?

जसे की जूनचा हप्ता जुलैच्या पहिल्या आठवड्यात जमा झाला, त्यानुसार आता जुलैचा हप्ता कधी मिळणार हा प्रश्न लाभार्थींना पडला आहे. काही रिपोर्ट्सनुसार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा जुलै महिना हप्ता या महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात खात्यावर जमा केला जाऊ शकतो.

योजना बंद होणार नाही, उलट रक्कम वाढवली जाईल

दरम्यान, विरोधकांकडून Ladki Bahin Yojana बंद होणार असल्याच्या आरोपावर प्रतिक्रिया देताना भाजप आमदार राम कदम यांनी स्पष्ट केलं आहे की, “पूर्वी म्हणत होते की ही योजना सुरू होणारच नाही, पण आम्ही ती सुरू करून दाखवली. कोट्यवधी महिलांना याचा थेट लाभ झाला आहे. आता म्हणतात दोन महिन्यात योजना बंद होईल. मी सांगू इच्छितो की ही योजना आता बंद होणार नाहीच, उलट यामध्ये मिळणारी रक्कम देखील वाढवली जाणार आहे.”

या योजनेत कोण पात्र आहे?

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana अंतर्गत वय वर्ष 21 ते 65 दरम्यानच्या पात्र महिलांच्या खात्यावर दरमहा ₹1500 जमा केले जात आहेत. आतापर्यंत या योजनेद्वारे 12 हप्त्यांमध्ये एकूण ₹18000 इतकी रक्कम लाभार्थींना मिळाली आहे आणि आता सर्वजणी जुलै महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत.

Leave a Comment