PM Kisan Beneficiary Status:9 कोटी शेतकऱ्यांसाठी खुशखबर, या गुरुवारी खात्यामध्ये येणार 19 व्या हप्त्याचे 4000 हजार रुपये, पती-पत्नी दोघांना पण मिळणार लाभ
या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde), अजित पवार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar bawankule) आणि इतर नेते उपस्थित होते. अधिवेशनाच्या समाप्तीनंतर घेतलेल्या या पत्रकार परिषदेत सरकारने आगामी योजना स्पष्ट केल्या आणि विरोधकांवरही निशाणा साधला.shetkari karjmafi
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी जनसुरक्षा विधेयकावर विरोधकांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. “विरोधकांनीच संयुक्त समितीत विधेयकाला संमती दिली होती, पण आता वेगळी भूमिका घेत आहेत,” अशी टीका त्यांनी केली. तर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “विरोधक प्रश्नोत्तराच्या तासाला गैरहजर होते. ही संधी त्यांनी गमावली.”
Sarpanch salary :सरपंच उपसरपंच यांच्या पगारांमध्ये भक्कम वाढ, आता मिळणार तब्बल “एवढा” पगार
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करत म्हटलं, “शासन जनतेच्या प्रश्नांवर काम करत आहे. शिक्षक असोत वा अन्य कर्मचारी, त्यांच्या अडचणी दूर करण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत. गेल्या तीन वर्षांपासून विकासाला गती देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.”
दीर्घकालीन उपायांवर सरकारचा भर
सरकारची भूमिका स्पष्ट असून कर्जमाफीच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांसाठी ठोस आणि शाश्वत उपाययोजनांवर भर देण्यात येणार आहे. नवीन समितीच्या शिफारशीवर आधारित योजनांची लवकरच अंमलबजावणी केली जाईल, असंही संकेत देण्यात आले.
या पत्रकार परिषदेतून हे स्पष्ट झालं की, कर्जमाफीबाबत सरकार जबाबदारीने निर्णय घेईल आणि दीर्घकालीन धोरणात्मक उपाययोजनांवर लक्ष केंद्रीत करेल. त्यामुळे येत्या काही दिवसांत शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.