व्यवसाय करण्यासाठी तरुणांना मिळतंय 20 लाख रुपयांचे कर्ज
येथे करा अर्ज
सिबिल स्कोअर किती असावा?
सिबिल स्कोअर हे 300 ते 900 या दरम्यान असतो. हा स्कोअर जितका जास्त, तितकी कर्ज मंजुरीची शक्यता अधिक. सामान्यता 700 पेक्षा जास्त स्कोअर असलेल्यांना बँका सहज कर्ज मंजूर करतात. 700 पेक्षा कमी स्कोअर असल्यास बँक कर्ज देताना अडचण निर्माण करते किंवा जास्त व्याजदर लावते.
सिबिल स्कोअर तपासणे का आवश्यक?
कर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर सर्वप्रथम तुमचा सिबिल स्कोअर तपासावा. हा स्कोअर बँकांना तुमची कर्ज परतफेडीची क्षमता दाखवतो. पूर्वी घेतलेल्या कर्जाचे हप्ते वेळेवर भरलेत की नाही, कोणतीही थकबाकी आहे का, हे सर्व स्कोअरमध्ये परावर्तित होते.
सिबिल स्कोअर कसा सुधारायचा?
जर तुमचा सिबिल स्कोअर 700 च्या खाली असेल, तर काही साध्या उपायांनी तो सुधारता येतो. सुरू असलेल्या कर्जाचे हप्ते नियमितपणे आणि वेळेत भरा. कोणतेही कर्ज सुरू नसेल, तरीही EMI वर खरेदी करून आर्थिक शिस्त दाखवा.
ऑनलाइन खरेदी करताना बाय नाऊ, पे लॅटर सुविधा वापरून वेळेत परतफेड करा. पेट्रो कार्ड वापरून पेट्रोल भरणे आणि त्याचं बिल वेळेवर भरणे, तसेच पोस्टपेड मोबाइल सेवा वापरून बिल वेळेवर भरणे या सवयींचाही स्कोअर सुधारण्यावर सकारात्मक परिणाम होतो.
सिबिल स्कोअर बिघडू नये म्हणून काय करावे?
चांगला ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही कर्जाचा हप्ता किंवा क्रेडिट कार्डचं बिल वेळेवर भरावं. क्रेडिट कार्डचा वापर मर्यादित आणि जबाबदारीने करावा. बँका अनेक ऑफर्स देतात, परंतु अनावश्यक खर्चामुळे स्कोअरवर परिणाम होऊ शकतो. जुनं कर्ज फेडल्याशिवाय नवीन कर्ज घेणं टाळावं. कर्जाची परतफेडीची क्षमता लक्षात घेऊनच कर्ज घ्यावं. business loan for young entrepreneurs
सिबिल स्कोअर म्हणजे तुमच्या आर्थिक शिस्तीचं प्रतिबिंब. भविष्यातील आर्थिक गरजांसाठी कर्ज घेणं सुलभ व्हावं, यासाठी सिबिल स्कोअर सुधारण्याची आणि टिकवून ठेवण्याची गरज आहे. वेळेवर परतफेड, नियोजनबद्ध खर्च, आणि जबाबदारीने घेतलेले आर्थिक निर्णय यामुळेच तुम्ही तुमचं क्रेडिट प्रोफाइल मजबूत करू शकता.