पैसे होणार वसूल
येथे पहा अपात्र महिला यादी
वार्षिक उत्पन्नावर आधारित पात्रता
या योजनेत सहभागी होण्यासाठी कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. जर उत्पन्न या मर्यादेपेक्षा जास्त असेल, तर त्या कुटुंबातील महिला अपात्र ठरतील.
लाडकी बहीण योजनेचे ₹3000 खात्यात जमा! तुमचं नाव यादीत आहे का? लगेच पहा! ladki bahin instalment 2025
आयकर भरणाऱ्यांसाठी नियम
कुटुंबातील कुठलाही सदस्य आयकर भरत असेल किंवा नियमितपणे आयकर विवरणपत्र (ITR) दाखल करत असेल, तर त्या कुटुंबातील महिलेला योजनेचा लाभ मिळणार नाही.
सरकारी कर्मचारी आणि निवृत्तिवेतनधारक यांना अपात्रता
राज्य किंवा केंद्र शासनाच्या सेवा, स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळे यामध्ये नियमित नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या कुटुंबातील महिला या योजनेसाठी पात्र नाहीत. याशिवाय, सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन (पेन्शन) घेणाऱ्यांच्या कुटुंबातील महिला देखील अपात्र ठरवण्यात येतात.
अडीच लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या खाजगी क्षेत्रातील कर्मचारी, स्वयंसेवक, आणि कंत्राटी कामगार यांच्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. कारण त्यांची नोकरी ही सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे स्थिर नसते आणि उत्पन्न मर्यादेत असते.
अन्य सरकारी योजनांचा लाभ घेत असल्यास अपात्रता
ज्या महिलांना शासनाच्या इतर योजनेतून दरमहा दीड हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम मिळते, त्या लाडकी बहीण.योजनेसाठी पात्र नाहीत. उदाहरणार्थ, संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावण बाळ योजना यांचा लाभ घेणाऱ्या महिलांना या योजनेचा हप्ता मिळणार नाही.
पीएम किसान योजनेतील महिलांना फक्त ५०० रुपयांचा हप्ता मिळतो, कारण ती रक्कम दीड हजार रुपयांच्या मर्यादेपेक्षा कमी आहे.
राजकीय पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबासाठी अटी
ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार अथवा आमदार आहेत, त्यांच्याही कुटुंबातील महिला या योजनेसाठी पात्र नाहीत. तसेच, राज्य किंवा केंद्र शासनाच्या महामंडळ, बोर्ड किंवा समित्यांवरील अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक अथवा सदस्य असलेल्या कुटुंबातील महिलांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.Ladki Bahin Yojana No Installment
चारचाकी वाहनधारक कुटुंबांना लाभ नाही
ज्या कुटुंबांकडे चारचाकी वाहन आहे (ट्रॅक्टर वगळून), त्या कुटुंबातील महिलांना योजनेचा हप्ता मिळणार नाही. वाहन कुटुंबातील कुणाच्याही नावावर असले तरीही ही अट लागू होईल.
अपात्र लाभार्थ्यांवर कारवाई सुरू
वरील निकषांमध्ये न बसणाऱ्या अनेक महिलांना योजनेतून वगळण्यात आले आहे. सरकारने अशा लाभार्थ्यांचा हप्ता थांबवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे जर तुम्ही या निकषांमध्ये बसत नसाल आणि तरीही हप्ता मिळत असेल, तर तो कधीही थांबवला जाऊ शकतो.