maharashtra rain update:सध्या महाराष्ट्रात बऱ्याच भागांमध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम, मध्य आणि पूर्व विदर्भ, तसेच पश्चिम महाराष्ट्रात आता काही दिवस पाऊस फारसा पडणार नाही. काही ठिकाणी थोडाफार पाऊस होईल, पण तोही फारसा नाही. कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे जिल्ह्यात पाऊस झाला होता, पण आता तिकडेही उघडं राहण्याची शक्यता आहे.
“या जिल्ह्यांमध्ये मुसळधार
पावसाची शक्यता!”
शेतकरी भाऊंनो, तुम्हाला वाटत असेल की आता जोरदार पाऊस केव्हा पडेल? तर हवामान विभाग म्हणतं की ज्या भागांमध्ये अजून चांगला पाऊस झालेला नाही, तिकडे जुलै महिन्याच्या शेवटी, आणि ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पाऊस वाढेल.
हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी सांगितलं की, 13 जुलैपासून पुढील दोन दिवस जळगाव, धुळे आणि नंदुरबारमध्ये काही ठिकाणी हलकासा पाऊस होईल. पण हा पाऊस थोडकाच आणि सगळीकडे नाही. लातूर, सोलापूर, बीड, अहिल्यानगर, जालना, परभणी, संभाजीनगर आणि नांदेड या जिल्ह्यांत 13 ते 15 जुलैदरम्यान ठिकठिकाणी थोडाफार पाऊस होण्याची शक्यता आहे.
नागपूर, भंडारा आणि गोंदिया या भागांमध्ये मात्र पुढील 2-3 दिवस चांगला पाऊस होईल. पण इतर ठिकाणी अजूनही सगळीकडे जोरदार पाऊस येणार नाही. जेथे पाऊस होईल, तिथेही तो अर्धा ते एक तासच राहील आणि फारसा जड स्वरूपात नसेल.
डख सरांनी शेतकऱ्यांना सल्ला दिला आहे की, पुढील 4-5 दिवस हवामान शांत राहणार असल्यामुळे शेतीची उरलेली कामं लवकर पूर्ण करावीत. कारण लवकरच हवामान बदलणार आहे आणि आंध्र प्रदेश व कर्नाटकमध्ये पावसाची स्थिती सुधारेल.
17 जुलैनंतर दक्षिणेकडून पावसाचे ढग महाराष्ट्रात येणार आहेत. त्यामुळे 18 ते 20 जुलै दरम्यान लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, अहिल्यानगर, आष्टी आणि पाटोदा या भागात जोरदार पाऊस पडेल.
म्हणून शेतकरी मित्रांनो, आत्ता मुसळधार पावसाची शक्यता नाही. त्यामुळे शेतीची कामं करण्यासाठी तुमच्याकडे पुरेसा वेळ आहे. योग्य वेळ वापरून घ्या.maharashtra rain update