Phone Pe द्वारे कर्ज मिळविण्यासाठी खालील प्रमाणे अर्ज करावा: –
• सर्वप्रथम तुम्हाला Google Play Store वरून PhonePe अॅप डाउनलोड करावे लागेल.
• त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकासह अॅपमध्ये रजिस्ट्रेशन करावे लागेल.
• मग तुम्हाला तुमचे बँक खाते UPI ID सह लिंक करावे लागेल.
• डॅशबोर्डमध्ये “Recharge & Bills” च्या पर्यायाजवळ “See All” पर्यायावर क्लिक करावे लागेल.
• त्यानंतर “Recharge & Pay Bills” च्या खाली काही थर्ड पार्टी कंपन्यांची नावे दिसतील, जसे Bajaj Finance LTD, Buddy Loan, Home Credit, Kreditbee, MoneyView, Avail Finance, Navi इत्यादी. तुम्हाला ज्या कंपनीकडून लोन घ्यायचे आहे ती निवडा.
• उदाहरणार्थ, जर तुम्हाला MoneyView वरून लोन घ्यायचे असेल, तर हे अॅप Google Play Store वरून डाउनलोड करा.
• त्यानंतर, त्याच क्रमांकावर रजिस्ट्रेशन करा, ज्यावर तुम्ही PhonePe वर रजिस्ट्रेशन केले होते.
• मग एक नवीन पेज उघडेल, जिथे तुम्हाला काही वैयक्तिक माहिती द्यावी लागेल.
• तुम्हाला पर्सनल लोनचे सर्व ऑफर दिसतील. “Select Your Loan Plan” च्या अंतर्गत तुमच्या इच्छेनुसार कोणताही प्लॅन निवडा.
• ही प्रकिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला मंजूर झालेले कर्ज, व्याजदर, ईएमआय याचा तपशील समजेल.
• सर्व नियमांची पडताळणी झाल्यावर तुम्हाला ते कर्ज घ्यायचे आहे की नाही याची परवानगी मिळाल्यावर बँक तुमच्या खात्यामध्ये कर्जाची रक्कम हस्तांतरित करते.