Pm Kisan Installment : केंद्रातील मोदी सरकारने नवरात्र उत्सवात देशातील शेतकऱ्यांना मोठी भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. 5 ऑक्टोबरला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. पी एम किसानच्या अधिकृत संकेतस्थळावर अठराव्या हफ्त्याची तारीख सरकारने डिक्लेअर केलीय.
हा पुढील हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी वाशीम येथे आयोजित शेतकरी कार्यक्रमातून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार अशी शक्यता आहे. यामुळे, पीएम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेल्या नमो शेतकरी चा पुढील हप्ता कधी मिळणार अशीही विचारणा आता राज्यातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून होऊ लागली आहे.
Pm Kisan Installment
अशातच नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्ता संदर्भात एक मोठी माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नमो शेतकरीचा पाचवा हप्ता म्हणजे माहे ऑगस्ट २०२४ ते नोव्हेंबर २०२४ दरम्यानचा हफ्ता व यापूर्वीच्या हप्त्यांमधील प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी आवश्यक निधी वितरित करण्यास सरकारने मान्यता दिली आहे.
शिंदे सरकारने यासाठी २२५४.९६ कोटी इतका निधी वितरीत करण्यास मंजुरी दिली असल्याची बातमी समोर आली आहे. यामुळे पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता जमा झाल्यानंतर लगेचच नमो शेतकरी चा पुढील हप्ता म्हणजेच पाचवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की पीएम किसान योजनेप्रमाणेच नमो शेतकरी योजनेचे स्वरूप आहे. पी एम किसान अंतर्गत दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. हे पैसे एकाच वेळी न देता दोन हजाराचा एक हप्ता याप्रमाणे वितरित होतात.
आतापर्यंत पीएम किसान चे 17 हप्ते जमा झाले असून 18 वा हफ्ता पाच ऑक्टोबरला जमा होणार आहे. नमो शेतकरी योजनेअंतर्गत देखील दरवर्षी सहा हजार रुपये दिले जात आहेत. या पैशांचे वितरण देखील पीएम किसान प्रमाणेच होते.
आतापर्यंत नमो शेतकरी चे एकूण चार हफ्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. आता पाचवा हफ्ता पाच ऑक्टोबर नंतर शेतकऱ्यांच्या खात्यात येण्याची शक्यता आहे. यामुळे दिवाळीच्या आधीच राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असे दिसत आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना पीएम किसान चे 2000 आणि नमो शेतकरी चे दोन हजार असे चार हजार रुपये दिवाळीच्या आधीच मिळणार असे चित्र आहे. यामुळे नक्कीच राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.