“या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता!”

शेतकरी भाऊंनो, तुम्हाला वाटत असेल की आता जोरदार पाऊस केव्हा पडेल? तर हवामान विभाग म्हणतं की ज्या भागांमध्ये अजून चांगला पाऊस झालेला नाही, तिकडे जुलै महिन्याच्या शेवटी, आणि ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पाऊस वाढेल.

हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी सांगितलं की, 13 जुलैपासून पुढील दोन दिवस जळगाव, धुळे आणि नंदुरबारमध्ये काही ठिकाणी हलकासा पाऊस होईल. पण हा पाऊस थोडकाच आणि सगळीकडे नाही. लातूर, सोलापूर, बीड, अहिल्यानगर, जालना, परभणी, संभाजीनगर आणि नांदेड या जिल्ह्यांत 13 ते 15 जुलैदरम्यान ठिकठिकाणी थोडाफार पाऊस होण्याची शक्यता आहे.

नागपूर, भंडारा आणि गोंदिया या भागांमध्ये मात्र पुढील 2-3 दिवस चांगला पाऊस होईल. पण इतर ठिकाणी अजूनही सगळीकडे जोरदार पाऊस येणार नाही. जेथे पाऊस होईल, तिथेही तो अर्धा ते एक तासच राहील आणि फारसा जड स्वरूपात नसेल.